Chinchawd : चांद्रयान-२ मोहिमेनिमित्त पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे शनिवारी विशेष कार्यक्रम

एमपीसी न्यूज – भारत उद्या दि. ६ सप्टेंबरला अंतरीक्ष संशोधनात इतिहास रचणार आहे. या संपूर्ण मोहिमेविषयी व प्रत्यक्ष चांद्रयान उतरत्या वेळीचे थेट प्रेक्षपण चित्रफितीसह मंगळयान मोहिमेमध्ये सेवा दिलेले इस्रोचे निवृत्त वैज्ञानिक प्रो.ए. के. सिन्हा स्वतः शनिवारी (दि.७) सकाळी १०.३० ते १२. ३० या वेळेत सायन्स पार्क प्रेक्षागृहात या मोहिमेची विस्तृत माहिती देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क एज्युकेशन ट्रस्ट आणि  पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघ यांच्या सहयोगाने होणार आहे.

इस्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञाचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. चंद्रापासून अवघ्या ३५ किमी असलेले चांद्रयान भारतीय वेळेनुसार उद्या पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. यानाचे लँडिंग ५.३०  ते  ६.३० च्या दरम्यान विक्रम लॅंडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडेल. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश असेल. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला ठरेल.

या मोहिमेचा जगाला भविष्यकालीन होणारा उपयोग यावर मार्गदर्शन दृक श्राव्य साधनांद्वारे करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पिंपरी चिंचवड मधील शाळांना निमंत्रित करण्यात येणार आहे. शाळेतील प्रत्येकी पाच विद्यार्थी आणि एक शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. प्रवेश विनामूल्य असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथील दूरध्वनी क्रमांक ०२०-२७४५४०५०, ७७४४९४४३३३ यावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.