Maharashtra Police: महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक

Special Police Medal of Home Ministry to 10 Police Officers from Maharashtra उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने 2020 या वर्षीच्या विशेष पोलीस पदकांची घोषणा केली आहे.

एमपीसी न्यूज – उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील 121 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने 2020 या वर्षीच्या विशेष पोलीस पदकांची घोषणा केली आहे. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोण निर्माण व्हावा व उत्तम तपास कार्याची दखल म्हणून 2018 सालापासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षी महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.

विशेष पोलीस पदकासाठी देशातील 121 पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे 15, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील प्रत्येकी 10, उत्तर प्रदेशातील 8, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 7 अधिकारी कर्मचाऱ्यांसह उर्वरित अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 21 महिलांचा समावेश आहे.

विशेष पोलीस पदक जाहीर झालेले महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी –

# शिवाजी पंडीतराव पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, पुणे शहर)
# राजेंद्र सिदराम बोकडे, पोलीस निरीक्षक
# उत्तम दत्तात्रेय सोनवणे, पोलीस निरीक्षक
# नरेंद्र कृष्णराव हिवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
# ज्योती लक्ष्मण क्षीरसागर, पोलीस अधीक्षक
# अनिल तुकाराम घेरडीकर, उप विभागीय पोलीस अधिकारी
# नारायण देवदास शिरगावकर, उप पोलीस अधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती)
# समीर नाजीर शेख, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, नाशिक शहर)
# किसन भगवान गवळी, सहायक पोलीस आयुक्त
# कोंडीराम रघु पोपेरे, पोलीस निरीक्षक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.