Blood Donation Camp : भोसरी येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज  – स्पाईन रोड, भोसरी येथील ओयासिस (Blood Donation Camp) गॅलेक्सी हाउसिंग सोसायटी यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत हे रक्तदान शिबिर राबवले असून यामध्ये 80 रक्त पिशव्यांचे संकलन झाले.

Chakan : चालत जाणाऱ्या महिलेचे हिसकावले मंगळसूत्र

भाजपा युवा पदाधिकारी योगेश लांडगे,  शिवराज लांडगे, गणेश गवळी यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याबाबत गॅलेक्सी हाउसिंग सोसायटी अध्यक्ष कुंदन काळे म्हणाले, सोसायटीच्या वतीने पहिल्यांदाच रक्तदान शिबिर घेतले आहे. आपल्या सण-परंपरांच्या (Blood Donation Camp) माध्यमातून चांगले उपक्रम राबविण्याचा सोसायटी पदाधिकाऱ्यांचा उद्देश आहे. आजच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 80 पिशव्या रक्त संकलन झाले असून, यातून अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळणार आहे. कार्यक्रमासाठी खजिनदार सचिन लोढा, सेक्रेटरी बालाजी चालवा यांनी परिश्रम घेतले

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.