Thergon News : मोफत नेत्रदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड युवा सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या नेत्रदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये मोतीबिंदू सल्ला व त्यावरील मार्गदर्शन करण्यात आले.

गणेशनगर, शिव कॉलनी येथे झालेल्या शिबिराचे उद्घाटन युवा सेना शहर अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या हस्ते झाले. सामाजिक कार्यकर्ते विलास जगदाळे, नंदु सुतार, विजय पाटील, युवासेना पदाधिकारी शुभम चौधरी, विक्रम झेंडे, महेश गेजगे उपस्थित होते.

या शिबिरास मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये मोतीबिंदू सल्ला व त्यावरील मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.