SSC HSC EXAM : विलंब शुल्कासह फॉर्म नंबर 17 भरण्यासाठी 18 डिसेंबर पर्यंत मुदत

एमपीसी न्यूज – दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 सादर करण्यासाठी 6 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. आता विलंब शुल्कासह अर्ज सादर करण्यासाठी 18 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत निश्चित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यासंबधीचे प्रकटन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 2022 मध्ये होणा-या 10 वी, 12 वी च्या परिक्षेला खासगीरित्या प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांना विलंब शुल्काने 13 ते 18 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतील. दहावीसाठी 100 रूपये विलंब शुल्क तर बारावीसाठी 25 रूपये प्रती विद्यार्थी स्विकारून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जातील.

कोणाचाही अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्विकारला जाणार नाही असे मंडळाने म्हटले आहे.

अर्ज सादर करण्यासाठी लिंक

दहवीसाठी – http://form17.mh-ssc.ac.in
बारावीसाठी – http://form17.mh-hsc.ac.in

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.