SSC HSC Results : दहावी बारावीच्या निकालाबाबत व्हायरल होणाऱ्या तारखांवर विश्वास ठेऊ नका – शिक्षण मंडळ

Don't trust the dates that will go viral about the results of 10th and 12th - Board of Education

एमपीसी न्यूज – दहावी बारावीच्या निकालाच्या वेगवेगळया तारखा व्हॉटस्अॅप, फेसबुक तसेच विविध सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येत आहेत. शिक्षण मंडळाने निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे वायरल होणाऱ्या तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10वी) परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाने अद्याप जाहीर केलेली नाही.

त्यामुळे व्हॉटस्अॅप, फेसबुक व सोशल मिडीयावर परस्पर प्रसारीत होणाऱ्या निकालाच्या वेगवेगळया तारखांवर विद्यार्थी व पालक यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.

दरम्यान, फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी व 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळामार्फत मंडळाचे अधिकृत ईमेल, प्रसिध्दी माध्यम व वर्तमानपत्र यांमार्फत अथवा मंडळाच्या संकेतस्थळावरून प्रसिध्द करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.