Nigdi : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; विद्यार्थ्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु

एमपीसी न्यूज – स्कूल बसमधून येत असताना दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. त्यातील एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारले. यामध्ये विद्यार्थ्याचा अंतर्गत रक्तस्त्राव झाला. यामुळे त्याच्यावर निगडीतील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

हर्षल विश्वास कांबळे (वय 13, रा. बारलोटानगर, गायत्री कॉम्प्लेक्स, देहूरोड) असे उपचार सुरु असलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

हर्षल आकुर्डी येथील सेंट उर्सूला शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकतो. सोमवारी देहूरोडवरून स्कूलबसमधून शाळेत येत असताना त्याचे एका विद्यार्थी मित्रासोबत भांडण झाले. शाळेत गेल्यानंतर स्कूल बसमध्ये झालेल्या भांडणावरून शाळेतील शिक्षिकेने हर्षलला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा अंतर्गत रक्तस्त्राव झाला. हर्षल सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी गेला असता हा प्रकार उघडकीस आला. पालकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी निगडीमधील एका रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले.

याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तशी कोणी तक्रार देखील दिली नाही. असे निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.