BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी सायंकाळी सहा वाजता घरकुल निगडी येथे उघडकीस आली.

ऋषिकेश विठ्ठल सुवर्णकार (वय 19, रा. घरकुल) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पिंपरी-चिंचवडमधील एका खाजगी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील नोकरी करतात. सकाळी वडील नोकरीनिमित्त घराबाहेर गेले असता ऋषिकेशने घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. सायंकाळी सहा वाजता वडील नोकरीवरून घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.