Pune News : सोनावणे रुग्णालयात जळीत आणि पक्षाघाताच्या रुग्णांसाठी सुपरस्पेशालिटी विभाग

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या चंदुमामा सोनावणे रुग्णालयात जळीत आणि पक्षाघाताने आजारी असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पुढील पंधरा वर्षांसाठी सुपरस्पेशालिटी विभाग चालविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या सुविधेचा शहरातील गरीब रुग्णांना फायदा होऊ शकेल. ही सुविधा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) एक टक्का कमी दराने पुरविली जाणार आहे. या विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री संबंधित स्वयंसेवी संस्थेचे माध्यमातनू पुरविली जाणार असून, अतिदक्षता विभागासाठी आवश्यक यंत्रसामुग्री महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.