Susgaon Crime : अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – घरी अभ्यास करत असलेल्या अल्पवयीन (Susgaon Crime) मुलीला हाक मारून बाहेर बोलावून घेत तिच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 12) रात्री सुसगाव येथे घडली.

सचिन लक्ष्मण जाधव (वय  32, रा. सुसगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि. 15) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chakan News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी तिच्या घरी अभ्यास करत (Susgaon Crime) बसली होती. त्यावेळी आरोपीने हाक मारून तिला बोलावून घेतले. हाक मारली असल्याने मुलगी आरोपीजवळ गेली असता त्याने मुलीसोबत गैरवर्तन केले. मुलीला लग्नाची मागणी घालत तिने लग्न केले नाही तर जीवे मारण्याची त्याने धमकी दिली.

मागील काही दिवसांपासून आरोपी पीडित मुलीचा पाठलाग करत होता. रस्त्याने जाताना, खरेदी करताना तिचा पाठलाग करून तिचे व्हिडीओ बनवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.