Thergaon News: विश्वजीत बारणे आयोजित बालजत्रेला बालक- पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर युवासेना व युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या वतीने बालदिनानिमित्त भव्यदिव्य स्वरूपात सर्वांसाठी आयोजित केलेल्या मोफत बालजत्रेला बालक- पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. खाऊगल्ली, मनोरंजन कार्यक्रमांचा मुलांनी मनमुराद आनंद लुटला. बालकांचा प्रतिसाद पाहता जत्रेत एक दिवसाने वाढ करण्यात आली. जत्रेत सहभागी झालेल्या मुलांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या.

थेरगावातील या बालजत्रेचे उद्घाटनही बालकांच्या हस्तेच झाले. लहान मुलांच्या हस्ते हवेत फुगे सोडून अनोख्या पद्धतीने जत्रेचे उद्घाटन करण्यात आले. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर संघटिका सरिता साने, युवा अधिकारी विश्वजीत बारणे, युवा सेनेचे माउली जगताप, प्रदिप दळवी, धनाजी बारणे, प्रताप बारणे, निलेश पिंगळे, नंदू जाधव यांच्यासह परिसरातील मुले, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागीलवर्षीही बालजत्रा भरविली होती.

यंदाच्या बालजत्रेला बालक-पालकांची तुफान गर्दी झाली. मुलांनी जत्रेचा मनमुराद आनंद लुटला. मुलांचा प्रतिसाद पाहता जत्रेत एक दिवसाने वाढ करण्यात आली. आजही जत्रा चालू ठेवण्यात आली होती. जत्रेत खाऊचे स्टॉल मोफत लावले होते. मुलांनी विविध पदार्थ चाखून मनसोक्त आनंद घेतला. खाऊगल्ली, मनोरंजन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. खाऊ, खेळणी सर्व मोफत ठेवण्यात आले होते. तसेच जत्रेत सहभागी झालेल्या मुलांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या. मुलांच्या चेह-यावर मोठा उत्साह होता. त्यांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

विश्वजीत बारणे म्हणाले, ”कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुले मुक्तपणे संचार करु लागले आहेत. दोन वर्षानंतर मास्कविना बाहेर पडलेल्या मुलांनी बालजत्रेचा मनसोक्त आनंद घेतला. जत्रेतील खाऊगल्ली, मनोरंजन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. मुलांच्या चेह-यावरील आंनद, समाधान, उत्साह पाहून एक दिवसासाठी आयोजित केलेल्या बालजत्रेत आणखी एका दिवसाने वाढ करण्यात आली”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.