Construction material theft : बांधकाम साईटवरून साडेतीन लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरून चोरटयांनी (Construction material theft) साडेतीन लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 11) सकाळी चऱ्होली बुद्रुक येथील एक्झर्बिया सिंगा या बांधकाम साईटवर उघडकीस आली.

तानाजी राम जाधव (वय 32, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thergaon News: विश्वजीत बारणे आयोजित बालजत्रेला बालक- पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली बुद्रुक येथे एक्झर्बिया सिंगा ही नवीन बांधकाम साईट सुरु आहे. या साईटवरून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी मुंडे, प्रॉप्स, सिकंजा, युज्या, (Construction material theft) टायर रॉड,अँकरनट असे एकूण साडेतीन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.