Sushma Andhare : पहिला डाव भुताचा म्हणून दिपाली सय्यद यांना सोडून देते – सुषमा अंधारे

एमपीसी न्यूज : काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Sushma Andhare) शनिवारी त्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी दिपाली सय्यद यांनी शिवसेना नेत्या नीलम गोरे सुषमा अंधारे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या या टीकेवर आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सुषमा अंधारे म्हणाल्या, दसरा मेळाव्यातील माझे शिवतीर्थावर चे भाषण झाल्यानंतर दिपाली सेठ यांनी मला फोन केला होता. ताई लय भारी धुतलं असं म्हणत त्यांनी माझं कौतुकही केलं होतं. परंतु आता त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. करिअरची गरज म्हणून त्या काही वक्तव्य करत असतील तर देव त्यांचं भलं करो. आज आमचे नेते संजय राऊत बाहेर येणार आहेत. आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे पहिला डाव भुताचा म्हणून मी दिपाली सय्यद यांना सोडून देते असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Deadbody found : वळवण गावातील कॅनॉल जवळील खड्ड्यात पुरुषाचा मृतदेह सापडला

दिपाली सय्यद यांनी आज मुंबईत बोलताना मुंबई महापालिकेतील खोके मातोश्रीवर येणे बंद झाल्याची मोठी खंत रश्मी ठाकरेंना आहे अशी टीका केली होती.(Sushma Andhare) खरंतर नीलम गोरे आणि सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. रश्मी ठाकरे खऱ्या सूत्रधार आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.