Deadbody found : वळवण गावातील कॅनॉल जवळील खड्ड्यात पुरुषाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज : वळवण गावामध्ये कॅनॉल जवळील खड्ड्यात आज (Deadbody found) एका पुरुषाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती वन्यजीव मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी दिली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती देताना, लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, वळवण गावातून जाणाऱ्या टाटा कपंनीच्या कॅनॉल शेजारील खड्ड्यात झिरपणाऱ्या पाण्यात आज दुपारी 4 ते 4.30 वा चे दरम्यान एक मृतदेह दिसल्याची पोलिसांना माहिती मिळाली.

Deepali Dhumal : पाणीपुरवठा विभागामार्फत येणाऱ्या नोटीसा देणे थांबवावे : दीपाली धुमाळ

तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. हा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून तो मृतदेह एका पुरुषाचा आहे.हा मृतदेह फुगलेल्या आवस्थेत आहे. त्याचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.