Pune crime : मैत्रिणीचे फोटो आणि अश्लील व्हिडिओ वेबसाईटवर केले अपलोड, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल

  एमपीसी न्यूज : काही दिवसांपूर्वी पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या मुलाने मैत्रिणीचे न्यूड फोटो आणि अश्लील व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड केले. मार्च ते सप्टेंबर 2022 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. (Pune crime) मैत्रिणीने प्रेम संबंध पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्याने त्याने हे धक्कादायक कृत्य केले. याप्रकरणी आता लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमेय दबडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 25 वर्षे तरुणीने या प्रकरणी फिर्यादी दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुण हा महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र काही वर्षानंतर तरुणीने त्याच्यासोबत प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र तरीसुद्धा आरोपी अमेय या तरुणीच्या पाठीमागे लागला होता. तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र या तरुणीने त्याला नकार दिला.

Sushma Andhare : पहिला डाव भुताचा म्हणून दिपाली सय्यद यांना सोडून देते – सुषमा अंधारे

आरोपी अमेय याला तरुणीच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड माहित होता. याचाच वापर करून त्याने न्यूड फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर अपलोड केले.(Pune crime) तसेच तिच्या नावाने बनावट पॉर्न वेबसाईट सुरू केली आणि त्याच्यावर देखील फोटो व्हिडिओ अपलोड केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.