Pune news : कार रिव्हर्स घेताना एका व्यक्तीला चिरडले; पाच महिन्यानंतर डॉक्टर महिलेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 जून रोजी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीचा कार खाली चिरडून मृत्यू झाला होता.(Pune news) तब्बल पाच महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आता एका डॉक्टर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अल्लाबक्ष अन्वर शेख (वय 42) असे कार खाली चिरडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अश्विनी आदित्य साळुंखे या डॉक्टर महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे यांनी या प्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 7 जून रोजी अल्लाबक्ष हा चंदन नगर येथील जुना मुंढवा परिसरातील रिलॅक्स पॉईंट हॉटेल समोर दारू पिऊन झोपला होता.(Pune news) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर अश्विनी या कार रिव्हर्स घेताना तो त्याच्या कारखालील आला. दरम्यान हा प्रकार झाला तेव्हा कुणाच्याही लक्षात आला नाही. यामध्ये अल्लाबक्ष याचा मृत्यू झाला होता. तेव्हा अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने अकसमात मृत्यू अशी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली होती.

Pune crime : मैत्रिणीचे फोटो आणि अश्लील व्हिडिओ वेबसाईटवर केले अपलोड, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल

चंदन नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना अल्लाबक्ष शेख यांच्या मृत्यूला डॉक्टर अश्विनी साळुंखे जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले.(Pune news) डॉक्टर अश्विनी त्यांची कार रिव्हर्स घेत असताना मागे झोपलेल्या अल्लाबक्ष त्यांच्या अंगावर गेली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.