Hinjawadi Crime News : 5000 ग्लोज साठी 22.40 लाख रूपये घेऊन, ग्लोज न पाठवता फसवणूक

एमपीसी न्यूज – 5000 ग्लोज साठी 22.40 लाख रूपये घेऊन, ग्लोज न पाठवता फसवणूक केली. 20/07/2020 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीत बावधन येथे ही घटना घडली .

याबाबत रोहीत राम किशोरजी सोमाजी (वय 32, रा. बावधन, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून सिनर्जीक ट्रेलर व अॅटो सोल्युशन प्रा. लि. कंपनी (वय 32, रा. सरीता विहार, न्यु दिल्ली) आणि विनयकुमार काबरा (रा. निगडी पुणे) या दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी मंथली रेफरल मीट या व्हॉटस्अप ग्रुपवरती नायट्रेल ग्लोज होलसेल विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली. फिर्यादी यांनी 5000 ग्लोजसाठी 22 लाख 40 हजार रूपये आरोपींना पाठवले. पण, ग्लोज किंवा पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.