Talegaon : जिजामाता चौकात रिक्षावर झाड पडले

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील जिजामाता ( Talegaon)  चौकाजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षावर रस्त्याच्या बाजूला असलेले झाड पडले. यामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.

Smart City : अखेर  भूमीगत केबल नेटवर्कचे कंत्राट रद्द, सीईओ शेखर सिंह यांचा निर्णय

याबाबत माहिती अशी की, जिजामाता चौकातून स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या बाजूला प्रवासी रिक्षा (एमएच 14/जीसी 9749) पार्क केली होती. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेले एक झाड उन्मळून रिक्षावर पडले. यामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. झाडाच्या मुळाला कीड लागून मुळाजवळील भाग जीर्ण होऊन झाड पडले आहे. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य, नगरपरिषदेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. झाड रस्त्याच्या बाजूला पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला ( Talegaon) नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.