Talegaon : ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी लाच घेणारा लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – तळेगाव( Talegaon) दाभाडे नगरपरिषद येथील लेखापालने एका ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी त्याच्याकडे बिल रकमेच्या एक टक्के लाचेची मागणी केली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लेखापालावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 22 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आली.

Pune : लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवत तरुणांना लुटणाऱ्या तोतया अधिका-यास अटक

नरेंद्र अनंतराव कणसे (वय 55) असे गुन्हा दाखल झालेल्या लेखापालाचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे कंत्राट घेतात. त्यांना तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शवदाहिनीचे कंत्राट मिळाले आहे. दरम्यान त्यांनी कोरोना काळात सॅनिटायझरची फवारणी केली होती. त्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आरोपी लेखापाल कणसे याने तक्रारदार यांच्याकडे बिल रकमेच्या एक टक्के (पाच हजार रुपये) लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर विभागाने पाच वेळा सापळा लावून लेखापाल कणसे याने लाच घेतल्या बाबत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.