Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणात आरोपींनी पळवलेल्या दुचाकी सापडल्या

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर शुक्रवारी (दि. 12) दुपारी हत्या करण्यात आली. (Talegaon) हत्या केल्यानंतर आरोपींनी पळून जाताना दोन नागरिकांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या दुचाकी जबरदस्तीने चोरून नेल्या. या दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र आरोपी अद्याप फरार आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्यालयासमोर दबा धरून बसलेल्या आरोपींनी किशोर आवारे यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. (Talegaon) या हल्ल्यात किशोर आवारे यांच्या मानेला आणि पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच आरोपींनी त्यांच्यावर कोयत्यानेही अनेक वार केले.

Pimpri : अॅस्पायर चषक 2023 मध्ये इन्फ्ंटस एफसी, आर्यन्स ब संघांचा चमकदार विजय

हत्या केल्यानंतर आरोपी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यालयासमोरून पळून गेले. दरम्यान आरोपींनी रस्त्यात दोन व्यक्तींना पिस्तुलाचा धाक दाखवला. आणि त्यांच्या दुचाकी चोरून नेल्या. चोरलेल्या दुचाकीवरून आरोपी पळून गेले. या दुचाकी घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ सापडल्या आहेत.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत.(Talegaon) या पथकांना आरोपींच्या शोधात रवाना करण्यात आले आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सर्व गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेत आहेत.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.