Chaitanya School: : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचा एकच नारा हर घर तिरंगा हमारा

एमपीसी न्युज : इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल(CBSE) मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.(Chaitanya School) भारताच्या नकाशाची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी हातात ध्वज घेऊन शाळेच्या मैदानात तयार केली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचा एकच नारा हर घर तिरंगा हमारा’ अशा दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी घेतलेल्या विविध कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना व्यक्त केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी परेड संचलनाच्या माध्यमातून तिरंगी ध्वजाला सलामी दिली.

 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू मनोज स्वामी हे होते, त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी परेड संचलनाच्या माध्यमातून तिरंगी ध्वजाला सलामी दिली. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे या कार्यक्रमात 75 वा अमृत महोत्सव व भारताच्या नकाशाची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी हातात ध्वज घेऊन छान प्रकारे तयार केली होती. त्यावेळेस ‘ए मेरे वतन के लोगो” हे देशभक्तीपर  गीत सादर केले गेले. शाळेतील सर्वांची मने देशभक्तीच्या या वातावरणात भारलेली होती.

Talegaon Dabhade : स्वातंत्र्य दिनानिमित्त तळेगाव परिसरात राष्ट्रभक्ती रसाचा पुर

कार्यक्रमात देशभक्तीपर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी मध्ये तर इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी संस्कृत मध्ये गीत सादर केले आज या निमिताने भारतीय व विदेशी भाषेचा सुरेख संगम सर्वाना अनुभवायला मिळाला.(Chaitanya School) विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशाबद्दल चा अभिमान व्यक्त केला.इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी रोप मलखांबाची मनमोहून टाकणारी प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर आंतरशालेय रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेला इयत्ता नववीचा विद्यार्थी साहिल रात्रे व रजत पदक मिळवणारा इयत्ता आठवीचा विद्यार्थी सुप्रीम मंडल या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकाचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू मनोज स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, शाळेतील परेड संचलन, शिस्तबद्धता, मलखांब प्रात्यक्षिक बघून त्यांचे मन भाराऊन गेले व त्यानी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. या शाळेतील विद्यार्थी नक्कीच गावाचे, तालुक्याचे, नव्हे तर देशाचे नाव रोशन करतील असे प्रतिपादन ही त्यांनी यावेळी केले.(Chaitanya School) चैतन्य इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचे कार्य तत्परतेने करत आहे या कार्यात सर्व पालकांनी सुद्धा उस्फुर्त पणे सहभाग घ्यावा असे आवाहन त्यानी सर्व पालकांना केले व विद्यार्थ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 

संस्थेचे संस्थापक भगवान शेवकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतामध्ये ‘आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण आनंदाने साजरा करत आहोत म्हणून आनंद व्यक्त केला. आजचा विद्यार्थी उद्याच्या भारताचा सक्षम आधार आहे .(Chaitanya School) त्यांना घडविण्यासाठी कुटुंब व्यवस्था व शिक्षण व्यवस्था हे दोन महत्त्वाचे घटक आहेत त्यांनी आपले योगदान देणे अतिशय महत्त्वाचे आहे. तरच उद्याचा विद्यार्थी भारताची धुरा सक्षमपणे  पेलू शकेल’. असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

शेवटी प्राचार्य हेमलता खेडकर मॅडम यांनी अमृत महोत्सवाबद्दल आपले मोलाचे मत व्यक्त केले देशाच्या तिरंग्याचा रंग प्रत्येक भारतीयाच्या मनावर ज्यावेळेस अधिराज्य करेल.(Chaitanya School) तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करू असे मत त्यांनी व्यक्त करून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, पालक शालेय समितीचे सर्व उपस्थित सभासद सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या देशभक्तीपर गीताने झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.