_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon Dabadhe: वॅाक करणाऱ्या व्यक्तीला रिव्हॅाल्वरचा धाक दाखवून 4 तोळ्यांची चेन, 3 तोळ्यांचे ब्रेसलेट लंपास

Talegaon Dabadhe: A mob carrying a gold chain and bracelet in fear of a revolver फिर्यादी बाळासाहेब घोटुकुले हे त्यांच्या घरासमोर वॉकिंग करत असताना त्याठिकाणी चार ते पाच इसम एका चार चाकी गाडीमधून आले.

एमपीसी न्यूज – स्वत:च्या घरासमोर वॅाक करणाऱ्या इसमाच्या कानपट्टीला रिव्हॅाल्वर लावून 4 तोळ्यांची चेन व 3 तोळ्यांचे ब्रेसलेट जबरदस्ती त्याच्या काढून घेतल्याचा प्रकार शनिवारी (दि.4) आढळे (ता.मावळ) येथे घडला. इसमाच्या मदतीस आलेल्या त्याच्या दोन भावांना तलवारीने जखमी करून पाच जणांच्या टोळक्याने त्या ठिकाणावरून पळ काढला.

बाळासाहेब लक्ष्मण घोटुकुले (वय. 35, रा.आढळे बु, ता. मावळ, जि. पुणे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सुभाष ज्ञानेश्वर म्हाळस्कर, अमित अंकुश घोटुकुले, प्रवीण विठ्ठल म्हाळस्कर, रोहिदास तुकाराम म्हाळस्कर, अमोल दाभाडे व इतर चार ते पाच जण ( सर्व रा. आढळे बु, ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळासाहेब घोटुकुले हे त्यांच्या घरासमोर वॉकिंग करत असताना त्याठिकाणी चार ते पाच इसम एका चार चाकी गाडीमधून आले.

त्यापैकी आरोपी सुभाष म्हाळस्कर यांने हातात रिव्हॉल्वर घेऊन व आरोपी अमित घोटुकुले हा हातात तलवार घेऊन फिर्यादी बाळासाहेब यांच्या अंगावर धावून गेले. तसेच उर्वरित आरोपींनी बाळासाहेब यांना पकडले.

सुभाष म्हाळस्कर यांने बाळासाहेब यांच्या कानपट्टीला रिव्हॅाल्वर लावून 2,10,000 किंमतीची गळ्यातील 4 तोळ्यांची चेन तसेच हातातील 3 तोळ्यांचे ब्रेसलेट जबरदस्तीने काढून घेतले.

बाळासाहेब बचावासाठी ओरडले असता त्यांचे दोन भाऊ मदतीसाठी धावून आले. आरोपी अमित घोटुकुले याने बाळासाहेब यांचा भाऊ भाउसाहेब घोटकुले याच्या ओठावर तलवारीची मूठ मारून त्याला जखमी केले. त्यानंतर इतर चार ते पाच जण मारण्यासाठी फिर्यादीच्या अंगावर धावून आले. तळेगाव दाभाडे पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.