Talegaon Dabhade: स्मशानभूमीकडे जाणा-या गटारीला मोठे भगदाड; दुरुस्ती करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील स्मशानभूमीकडे जाणा-या मुख्य रस्त्याच्या मधल्या गटारीवर मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार आणि इतर विधी करण्यासाठी जाणा-या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुरुस्तीचे काम लवकरात लवकर व्हावे. हि मागणी नागरिकांकडून नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार केली जात आहे; मात्र, प्रशासन त्या गोष्टीकडे डोळेझाक करीत आहे, असे समजत आहे.

तळेगाव दाभाडे येथे सध्या बनेश्वर स्मशानभूमी हि एकच स्मशानभूमी आहे.तळेगावच्या सद्यस्थितीतील लोकसंख्येचा विचार केला तर दररोज या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी, रक्षा पाण्यात सोडणे(सावडणे),किंवा दशक्रिया विधी या सारखे विधी होत असतात.

  • या विधीसाठी गावातील गावकरी तसेच बाहेर गावावरून नातेवाईक.पाहुणे मंडळी या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी घाई-गडबडीने येत असतात. तसेच येथील श्री बनेश्वराचे शिवलिंगाचे दर्शनासाठी व स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यासाठी जाणारा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी येणा-या नागरिकांना या पडलेल्या मोठ्या खड्याला चुकवून पुढे जावे लागते. घाईगडबडीत लक्षात आले नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारा त्रास आणि दु:खद घटनेने होणारे दु:ख या खड्यात गेलेल्या व्यक्तीला सहन करावे लागते.

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचे उत्सवप्रसंगी या खड्याची तात्पुरती डागडुजी केली होती. पण, ती निष्फळ ठरली असून याचे काम कायम स्वरूपी चांगले व्हावे, अशी मागणी परिसरातील नागरीक करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.