Talegaon Dabhade : खऱ्या नोटांऐवजी कागदाची बंडले देऊन 40 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- पाच टक्क्यांनी रक्कम वाढवून देण्याचे आमिष दाखवत हातचलाखीने खऱ्या नोटांच्या ठिकाणी कागदाची बंडले ठेवून तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमाटणे फाटा येथे घडली.

या प्रकरणी विश्वास वसंत मुऱ्हे (वय २९ रा. सत्यम निवास, शिरगाव ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी ललकार कृष्णा झिगरे (६०३, सनसिटी रास्ता, दौलतनगर, सिंहगड रोड ) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा साथीदार फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.