Talegaon Dabhade : तळेगाव शहरात तब्बल साडेसहा हजार मूर्तींचे संकलन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरात गणेशोत्सव उत्साहात पार पडला. कोरोनाचे नियम पाळून नागरिकांनी हा उत्सव साजरा केला. विसर्जनाच्या दिवशी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी मूर्तीदान करण्याचे आवाहन केले होते. त्यात तब्बल सहा हजार 416 गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. त्यातील पाच हजार 48 मूर्ती विसर्जन तर एक हजार 416 मूर्तींचे दान करण्यात आले आहे.    

तळेगाव शहरात 7 दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. सातव्या दिवशी विधीवत परंपरेनुसार श्री गणेशाचे विसर्जन होते. या वर्षी कोरोनामुळे शासनाने सार्वजानिक ठिकाणी विसर्जन करू नये, असा नियम केला होता. शक्यतो आपल्या घरातील हौदात श्री गणेशाचे विसर्जन करावे किंवा मूर्तीदान करावे, असे आवाहन केले होते.

त्यानुसार मूर्तीदान व मूर्ती संकलन विविध सामाजिक संस्थांनी केले. नगर परिषदेने तळेगाव शहरात 7 ठिकाणी संकलन केंद्रे उभारली होती. याठिकाणी किशोर भेगडे यांच्या नियोजनानुसार 711 मूर्ती जमा झाल्या.

तर जनसेवा विकास समितीकडून 3 हजार 400 मूर्ती जमा झाल्या. संतोष भेगडे स्पोर्ट फाउंडेशनकडे 1 हजार 648 मूर्ती जमा झाल्या. राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानकडून 657 मूर्ती जमा झाल्या. यापैकी 5 हजार 48 मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. तर 1 हजार 368 मूर्ती दान म्हणून नगर परिषदेकडे संकलित करण्यात आल्या.

या शिवाय यावर्षी शासनाने केलेल्या आवाहनास गणेशभक्त व रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, फ्रेंड्स ऑफ नेचर, लायन्स क्लब या संस्थांनी सभासदासह मूर्ती संकलनाच्या कामात सहभाग घेतला होता. तर ऊर्से येथील महिंद्र सीआयई कंपनीने विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तामधील पोलीस, होमगार्ड यांना भोजनाचे पाकीट बंदोबस्त प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांच्याकडे दिले. याबाबतचे नियोजन कंपनीचे मॅनेजर रविंद्र वैद्य, संदीप पानसरे, प्रेम प्रसाद यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.