Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात कॉमर्स फेस्टिवलचा समारोप 

एमपीसी न्यूज – इंद्रायणी महाविद्यालयात चार दिवसीय कॉमर्स फेस्टिवल (Talegaon Dabhade) उत्साहात संपन्न झाला. समारोपाच्या दिवशी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उपस्थित प्राचार्य आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस के मलघे,वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.आर.आर.भोसले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.के.वी.अडसूळ, परीक्षा  विभाग प्रमुख,प्रा.डॉ.एम व्ही देशमुख, मराठी विभागप्रमुख विजयकुमार खंदारे,डाॅ संदीप कांबळे,प्रा सत्यजित खांडगे, डाॅ सत्यम सानप, डाॅ प्रमोद बोराडे, प्रा दीप्ती पेठे, प्रा छाया काशीद तसेच कला व वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

 

आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे म्हणाले की काॅमर्स फेस्टिवलच्या निमित्ताने वाणिज्य विभागाने काॅमर्सचा उल्लेख सार्थ करून दाखविला.आपल्या महाविद्यालयाची ‘काॅमर्स ‘ ही जुनी परंपरा आपण सार्थ ठरवत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
काॅमर्स हे इतर शाखांपेक्षा वेगळेच करिअर आहे. त्यामुळेच विद्यार्थी संख्याही मोठी आहे असे सांगत काॅमर्स विभागाच्या ह्या अनोख्या फेस्टिवल बद्दल डाॅ मलघे यांनी विशेष कौतुक केले.

 

 

 

 

Pune News : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा 129 वा स्थापना दिवस साजरा 

शनिवारी कॉमर्स फेस्टिवलचा समारोप झाला. समारोपाच्या दिवशी फॅशन शोच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये विद्यार्थ्यांनी भारतात साजरे होणारे विविध सणांचे सादरीकरण केले. आपल्या संस्कृतीतील सर्वधर्मसमभाव, जातीभेद मानू नका असा आशय या सादरीकरणात दाखविला. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. राधा गोहाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रज्वल शेडगे आणि अंकिता कलावडे यांनी केले.

 

 

 

पारितोषिक वितरण समारंभामध्ये वाणिज्य शाखेमध्ये विशेष प्राविण्य, विद्यापीठ परीक्षांमध्ये येणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे व चार दिवसांमध्ये पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्या संघाचे व व्यक्तीगत विद्यार्थ्यांचे मेडल,प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आर्या किशोर पाटील वाणिज्य तृतीय वर्ष या विद्यार्थिनीला ‘स्टुडन्ट ऑफ द इयर 2023’ हया पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

संस्थेचे कार्यवाह व कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे यांनी चार दिवस कॉमर्स फेस्टिवल मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
चार दिवस चाललेल्या ‘ काॅमर्स फेस्टिवल ‘च्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा रूपकमल भोसले,डाॅ आशा शिंदे, राधा गोहाड, अर्चना काळे,मुक्ती बाफना, प्रा डी पी काकडे, प्रसन्न नेने आदींनी विशेष परिश्रम घेतले. तसेच फेस्टिवलमध्ये विविध खाद्य पदार्थांचे स्टाॅल लावले होते. त्या स्टाॅलवरील चवदार पदार्थांचा सर्वांनी आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाचे संयोजन प्रा.डॉ आशा शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन  अल्पिशा जमादार व आकांक्षा जाधव यांनी केले,आभार निखिल गागट (Talegaon Dabhade) या विद्यार्थ्याने मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.