Talegaon Dabhade : पादचारी तरुणाला चौघांनी लुटले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाला चार जणांनी मिळून लुटले. चोरट्यांनी तरुणाकडून 31 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना बुधवारी (दि. 6) पहाटे साडेबाराच्या सुमारास दारुंब्रे गावाजवळ घडली.

रितुराज सुर्यप्रताप सिंग (वय 25, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रितुराज बुधवारी पहाटे दारुंब्रे येथून जात होते. गावाजवळ असलेल्या पुलावर ते आले असता चार अनोळखी चोरट्यांनी त्यांना अडवले. पैसे, मोबाईल फोन काढून देण्याचा दम चोरट्यांनी दिला असता रितुराज यांनी नकार दिला. त्यावरून चोरट्यांनी रितुराज यांच्याजवळील लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.