Talegaon Dabhade : विश्वासार्हता आणि पारदर्शक सहकारातून विकास साधता येतो

श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार अमोल मिटकरी यांचे प्रतिपादन

एमपीसी न्यूज – देशाच्या प्रगतीसाठी देशात सशक्त सहकार निर्माण करणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने विश्वासार्हता आणि पारदर्शकता या दोन तत्वांवर अधिक भर दिला पाहिजे. अशा सहकारातून विकास साधता येतो, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार अमोल मिटकरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, सहकारभूषण बबनराव भेगडे होते.

Vande Bharat Express : ‘वंदे भारत’च्या प्रवाशांना जेवणात मिळणार उकडीचे मोदक

यावेळी संस्थेचे संस्थापक संचालक बबनराव भोंगाडे,तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड रवींद्र दाभाडे,सुरेश धोत्रे,माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष जाधव,संस्थेचे आधारस्तंभ, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, संस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे, पुणे पीपल्स को ऑप- बँकेचे अध्यक्ष ॲड सुभाष मोहिते, संचालक जनार्दन रणदिवे, सुभाष नढे, जळगाव जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र पाटील, संतोष मु-हे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या सहकाराबाबत बोलताना आमदार मिटकरी म्हणाले की, सहकार चळवळ गाव पातळीपर्यंत नेण्याचे काम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आतापर्यंतच्या नेत्यांनी केलेले आहे. त्यामुळे ग्रामीण सहकारामुळे राज्याचा चेहरामोहरा बदलेला आहे. सहकारी क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी सहकारात विश्वास आणि पारदर्शकता या दोन गोष्टींसाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे.

पतसंस्थेतील पारदर्शक व्यवहाराबाबत त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या जोडोनिया धन उत्तम व्यवहारे l उदास विचारे वेच करी ll या अभंगाचा दाखला देत सहकारात आर्थिक विषमता नसावी, लहान- मोठा भेद हा वाद नसावा तरच देश पुढे जाईल. देण्यात आनंद आहे, घेण्यात आनंद नाही असेही मिटकरी म्हणाले. बचत केली ही श्रीमंती आहे. पैसे कमविणे श्रीमंती नाही. बचत ही महत्वाची ठेव असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बबनराव भेगडे म्हणाले की, सहकारातून आर्थिक विषमता नष्ट होते. गरजू आणि गरीबांना उभे राहण्याची ताकद मिळते. त्यासाठी नव्या पिढीतील तरूणांनी सहकारी क्षेत्रामध्ये जीव ओतून काम केले पाहिजे.सहकाराचा विकास केला पाहिजे. त्यासाठी गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार आधुनिकता आणली पाहिजे असेही भेगडे यांनी सांगितले. मोबाईल ॲप, नवीन प्रणालीचा उपयोग करून कामकाज करून घरबसल्या ग्राहकांना ऑनलाइन व्यवहार करता येईल, सोयीसुविधा देता येईल. असेही भेगडे यांनी सांगितले.

या सभेत पतसंस्थेकडून मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे यांना जीवनगौरव पुरस्कार, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांना श्री डोळसनाथ सहकार भूषण पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल रणजित काकडे यांना युवा उद्योजक पुरस्कार, सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल दिलीपभाई शहा यांना पुरस्कार, साहित्यिक, सांप्रदायिक क्षेत्रातील कार्याबद्दल अंबरचे संपादक सुरेश साखवळकर आदीं पुरस्कारार्थीं तसेच शंकर वाजे, सुनील दाभाडे,ओंकार भेगडे,राहुल देठे,सुप्रिया कोळी, शुभम तोडकर आदींचा सन्मान चिन्ह देऊन उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

याप्रसंगी माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, नंदकुमार कोतुळकर, रामभाऊ गवारे, डाॅ शाळीग्राम भंडारी,महेशभाई शहा, प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी, सोनबा गोपाळे गुरूजी,अरूण वाघमारे, मिलिंद शेलार,चंद्रजीत वाघमारे,सुनील भोंगाडेसह विविध संस्थांचे पदाधिकारी,संस्थेचे सभासद, कर्मचारीवृंद, दैनंदिन बचत प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश राक्षे,विकास कंद,कौस्तुभ भेगडे, अंकुशराव आंबेकर,आशिष खांडगे, शंकर भेगडे, संध्या देसाई,मेघा भेगडे, अनिल पवार, समीर भेगडे, वैभव भेगडे, दत्तात्रय भेगडे,विजय भेगडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन अतुल राऊत व प्रवीण मु-हे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत राहुल पारगे यांनी केले. प्रास्ताविक माजी नगरसेवक, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे यांनी केले. शरद भोंगाडे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.