Talegaon Dabhade : पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त तळेगाव शहर हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

29 एप्रिल विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकालाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक संस्कार रुजावेत या हेतूने विद्यार्थ्यांना वार्षिक निकाल सोबत कापडी पिशवी व माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे (Talegaon Dabhade) सचिव रो संतोष खांडगे,संस्थेचे सहसचिव शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष विल्सन सालेर,नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक,पैसा फंड प्राथमिक शाळेचे शालेय समिती अध्यक्ष विनायक अभ्यंकर,ॲड. पु.वा. परांजपे विद्यामंदिर शालेय समिती सदस्य अशोक काळोखे,पैसा फंड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लादे मॅडम,नगरपरिषद लोकमान्य टिळक शाळेचे मुख्याध्यापक चिमटे सर,स्वामी विवेकानंद स्कूलच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम, इयत्ता पहिली ते नववीचे सर्व विद्यार्थी व पालक, सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमास उपस्थित होते.

कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी!
या उपक्रमात नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण संस्था, इंद्रायणी विद्या मंदिर संस्था (Talegaon Dabhade) यांचे देखील सहकार्य लाभले. 29 एप्रिल विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकालाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक संस्कार रुजावेत या हेतूने विद्यार्थ्यांना वार्षिक निकाल सोबत कापडी पिशवी व माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले.

Pune News : महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे औषधी गुणांनी युक्त तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आले.

संतोष खांडगे यांनी अध्यक्षीय मनोगतात, प्लास्टिकच्या अतिरिक्त वापराने पर्यावरणाची व मानवाची होत असलेली हानी रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे व पर्यावरण प्रेमी बनले पाहिजे, अशा प्रकारचे मार्गदर्शन केले.

LPG New Price : गुड न्यूज! व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 171 रुपयांनी स्वस्त

इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून पर्यावरणाची प्रतिज्ञा म्हणून घेऊन वचनबद्ध करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री पांडुरंग पोटे यांनी केले तर आभार शालेय समिती सदस्य अशोक काळोखे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका वैशाली कोयते यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.