Talegaon Dabhade: तळेगाव नगरपरिषदेत सॅनिटायझर, मास्कचे वाटप

Talegaon Dabhade: Distribution of sanitizers and masks in Talegaon nagar parishad वैशाली दाभाडे यांनी राजकीय काम करत असताना विधायक काम करणे आवश्यक असल्याचे म्हटले.

एमपीसी न्यूज- तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुनीता काळोखे तसेच तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अध्यक्ष आशिष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, उपाध्यक्ष ज्योती शिंदे, जिल्हा इंटक अध्यक्ष विजय काळोखे, रूपाली दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, विना करंडे, मंगल मुऱ्हे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वैशाली दाभाडे यांनी राजकीय काम करत असताना विधायक काम करणे आवश्यक असल्याचे म्हटले. तर गणेश काकडे यांनी राजकारण कमी आणि समाजकारण जास्त असा दृष्टिकोन ठेवला तर समाज विकास होतो, असे मत मांडले. दिलीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.