Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेस महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची सदिच्छा भेट

एमपीसी न्युज – तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयास महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष सहकार (Talegaon Dabhade) नेते काकासाहेब कोयटे यांनी सदिच्छा भेट दिली. पतसंस्थेच्या कामकाजाची माहिती घेत कोयटे यांनी पतसंस्थेच्या उत्कृष्ट कार्यपध्दतीबद्दल कौतुक केले.

या प्रसंगी डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक,सहकार भूषण बबनराव भेगडे, राज्य फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे, संचालक शरद भोंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Pune News : भारतातील तिसरा उलूक उत्सव पिंगोरी येथे होणार 

यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात करण्यात आला. काकासाहेब कोयटे यांनी संस्थेच्या कार्याचा अहवाल घेऊन प्रत्यक्ष संगणक कार्यप्रणाली पाहिली. संस्थेचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा! दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.