Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे हळदी कुंकु व तिळगुळ समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुकताच हळदी कुंकु व तिळगुळ समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दर वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

या कार्यक्रमाला नगरसेवक संतोष भेगडे, वराळे गावचे सरपंच विशाल मराठे, समीर भेगडे, उपसरपंच गणेश आल्हाट, अतुल काकडे, रुपेश गरुड, शुभम सातकर, आशुतोष भेगडे, अनिकेत वाघोले तसेच महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. नगरसेवक संतोष भेगडे यांचे वतीने सर्व उपस्थित महिलांना भेटवस्तू देण्यात आली. यावेळी महिला भगिनींसाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ललिता मेहता विजयी झाल्या.

नगरसेवक संतोष भेगडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन पतसंस्थेच्या व्यवस्थापिका तस्लिम सिकिलकर, मनीषा कणसे, उषा भेगडे, सुलभा काळोखे यांनी केले. उपाध्यक्ष राहुल पंढरीनाथ पारगे यांनी सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.