Talegaon Dabhade : चंद्रकांत शेटे यांना डॉ. अशोक शिलवंत विद्याभूषण पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – अशोक सर्वांगीण विकास सोसायटी व अशोक सहकारी (Talegaon Dabhade) बँकेचे संस्थापक डॉ. अशोक शिलवंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा यावर्षीचा डॉ. अशोक शिलवंत विद्याभूषण पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील शिक्षणप्रेमी, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांना जाहीर झाला आहे. पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सोमवारी (दि. 9) पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.

पिंपरी येथील संत तुकारामनगरमधील आचार्य अत्रे सभागृहात होणा-या या सोहळ्यात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस अध्यक्षस्थानी असतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर, सहाव्या धम्मसंगीतीचे अध्यक्ष रतनलाल सोनग्रा आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते चंद्रकांत  शेटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात (Talegaon Dabhade) येणार असल्याची माहिती माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

World Cup 2023 : आज भारत ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार; तुल्यबळ संघात कोण ठरणार वरचढ?

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय वाटचाल करीत चंद्रकांत शेटे यांनी आपले स्वतःचे अढळस्थान शिक्षणविश्वात निर्माण केले आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून राहिलेले शेटे नगरसेवक म्हणून नगरपरिषदेवर 15 वर्षे होते. तळेगाव दाभाडे येथील स्नेहवर्धक मंडळ (बाल विकास) या संस्थेचे अध्यक्ष, मावळ तालुक्यातील  इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह म्हणून तर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक म्हणून गेली अनेक वर्षे अशा नामांकित शैक्षणिक संस्थांवर शेटे हे कार्यरत आहेत.

चंद्रकांत शेटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी आणीबाणीच्या काळात 18 महिने नाशिक आणि येरवडा येथील कारागृहात तुरुंगवास भोगला आहे. शेटे यांच्या शैक्षणिक समग्र कार्याचा गौरव विद्याभूषण पुरस्कार देऊन केला आहे. याबद्दल (Talegaon Dabhade) मावळ तालुक्यातील सर्वच स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.