Talegaon Dabhade :वाजवी दरातील कर्जपुरवठयामुळे वाढली सभासदांची आर्थिक पत – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – हिंद विजय पतसंस्थेने संस्थापक अ‍ॅड. रवींद्रनाथ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली गरुड भरारी घेतली आहे. वाजवी दरातील कर्जपुरवठ्यामुळे सभासदांची आर्थिक पत वाढली असून जिल्ह्यातील ऑडिट वर्ग ‘अ’असलेली ही एक अग्रगण्य पतसंस्था मानली जाते, असे गौरवोद्गार बाळा भेगडे यांनी काढले.

येथील हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या सोमाटणे शाखेचे उद्धाटन राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  भाजपाचे ज्येष्ठ नेते पिराजी काकडे होते.

यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे,किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संतोष मु-हे, माजी सरपंच राजेश मु-हे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, पंचायत समिती मावळच्या सभापती सुवर्णा कुंभार, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत शेटे, सहाय्यक निबंधक विठ्ठलराव सूर्यवंशी, सरपंच गोकुळ गायकवाड, उपसरपंच पूजा मु-हे, जि.प.सदस्य नितीन मराठे, पंचायत समिती माजी सदस्या सुमित्रा जाधव, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर, गोपीचंद गराडे, सोपानराव मु-हे, जगन्नाथ गोपाळे, सचिन मु-हे यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी भेगडे म्हणाले, सभासदांना तातडीने होणारा कर्जपुरवठा, नियमाप्रमाणे कर्जवसुली, सभासदांना मिळणारा प्रत्येक वर्षाचा लाभांश, सहकार व कार्यक्षेत्रात असलेला विश्वास तसेच होतकरू पदाधिकारी यामुळेच आर्थिक मंदी असताना देखील संस्थेची प्रगती होत असल्याचा आनंद होत आहे.

यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सदैव चांगले काम करून विनाकारण होणा-या आर्थिक खर्चाला टाळून सभासदाचे हित जपणा-या संस्थेची शाखा स्थापन होताना निश्चितच आनंद होत आहे, असे मत सहाय्यक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केले.

संस्थेने कर्जपुरवठा लवकर उपलब्ध करुन दिल्यामुळे माझ्या व्यवसायात प्रगती करू शकलो, असे मत संस्थेचे सभासद मुकुंद ठाकर यांनी व्यक्त केले. संस्थेचे सचिव कैलास भेगडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे नियोजन पतसंस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ दाभाडे, स्थानिक सल्लागार देवराम वाघोले, नामदेव आंद्रे, निलेश मु-हे, प्रभाकर काकडे, नंदू मु-हे, व्यवस्थापक दत्तात्रय कांदळकर, सचिन आरते, महेश दाभाडे आदींनी केले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पतसंस्थेचे सचिव कैलास भेगडे यांनी केले. संस्थापक अ‍ॅड. रवींद्रनाथ दाभाडे यांनी स्वागत केले. संचालक देवराम वाघोले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.