BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीच्या आवारात आग लागून पाच एकरांवरील गवत, झाडे भस्मसात

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीच्या आवारात काल, सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वणव्यामुळे मोठी आग लागली. या आगीमध्ये कंपनीच्या आवारातील पाच एकरांवरील गवत व झाडे जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एमआयडीसी अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तत्पूर्वी नागरिकांनी झाडांच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कंपनीची अनेक वाहने व मालमत्तेची हानी टळली.

मागील वर्षी चाकणच्या दंगलीत तळेगाव नगरपरिषदेचा बंब जळाल्याने आपत्कालीन परिस्थितीत नगरपरिषदेकडे एकही बंब उपलब्ध नाही. त्यामुळे ऐनवेळी मदत पोचण्यास उशीर झाला. कंपनीच्या आवारात तळीरामांचा वावर असतो. त्यांनीच आग लावली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

HB_POST_END_FTR-A2