BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : माळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश आल्हाट

एमपीसी न्यूज- माळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कुमार उर्फ गणेश पंढरीनाथ आल्हाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पूनम आल्हाट यांनी कार्यकाल संपल्यामुळे उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.

यासाठी इच्छुकांकडून उमेदवारीचे अर्ज मागविण्यात आले होते. परंतु कुमार उर्फ गणेश पंढरीनाथ आल्हाट यांचा एकमेव अर्ज आल्याने आल्हाट यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून सरपंच चंद्रकांत निवृत्ती (पुढारी) दाभाडे यांनी काम केले. तर त्यांना सहकार्य ग्रामसेवक के.पी.खेसे यांनी केले.

यावेळी माजी सरपंच गणेश दाभाडे, बाळासाहेब भोंगाडे, सुनील दाभाडे, वैशाली शेलार, पूनम आल्हाट, रजनी दाभाडे, जयश्री गोठे, राजश्री तळपे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3