Talegaon Dabhade : कलापिनी बालभवनची पारंपारिक दहीहंडी व पुस्तक हंडी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कलापिनी बालभवनची (Talegaon Dabhade) दहीहंडी बालचमूंनी रिमझिम पावसांच्या सरीत उत्साहात साजरी केली.  याही वर्षी मुले राधा कृष्णाच्या वेशभूषेत सजून आली होती. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन करून श्लोकाने झाली. मीरा कुन्नूर यांनी मुलांना दहीहंडीची माहिती व सुदाम्याची  मूठभर पोह्यांची गोष्ट सांगितली.

Pimpri : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पिता पुत्र गंभीर जखमी

पालकही मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. पालकांनी आज गोकुळात रंग व किती सांगू मी सांगू कुणाला या गीतावर फेर धरून कार्यक्रमात रंगत आणली. बाल भवनच्या सर्व बालचमुंनी ही उत्साहात दहीहंडी  भोवती फेर धरला व दहीहंडी फोडली.

त्याचवेळी  पुस्तक हंडीचेही आयोजन करण्यात आले होते. कादंबरी देशपांडे या पालकांनी कृष्णाच्या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. शेवटी मुलांना दही काल्याचा प्रसाद देण्यात आला. पारंपारिक पद्धतीने साजरी केलेली  दहीहंडी  बघून पालकही आनंदीत झाले. नटराजाच्या श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बालभवन प्रमुख मधुवंती रानडे मीरा कुन्नूर आणि ज्योती ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा शिंदे माधवी एरंडे आणि विशाखा देशमुख (Talegaon Dabhade) यांनी नियोजन केले होते .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.