Talegaon Dabhade: तळेगाव रेल्वे ब्रिजवरील दुचाकी आणि पिकअपच्या अपघातात दुचाकीस्वार ठार 

एमपीसी न्यूज – तळेगाव रेल्वे ब्रिजवर मोटारसायकल  आणि पिकअप यांच्यात भिषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.31) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

नचिकेत तुकाराम चिकणे (वय.22, रा.वडगाव फाटा, मोरया नगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच रोहन नखाते (वय.19 ) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीवरील दुसऱ्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पिकअप चालक अनिकेत काशीनाथ बोऱ्हाडे याला तळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव रेल्वे ब्रिजवर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भरधाव पिकअप (एमएच 14 एचयू 6214) व दुचाकी (एमएच 17 जीझेड 631) यांची समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर असलेल्या नचिकेत व रोहन हे गंभीर जखमी व दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

तळेगाव रेल्वे पुलालगत असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस पोलीस हवालदार दत्तात्रय हत्ते व अनंत रावण आणि इतर सहकार्यांनी घटना स्थळी धाव घेत जखमी युवकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यापैकी नचिकेत तुकाराम चिकणे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.