Talegaon Dabhade : पुणे जिल्हा भाजपा विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षपदी संस्कार चव्हाण यांची निवड

एमपीसी न्यूज- इंदोरी-मावळ येथील संस्कार तानाजीराव चव्हाण यांची पुणे जिल्हा भाजपा विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे तसेच जिल्हा भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष विशाल घायतडक यांच्या हस्ते देण्यात आले.

चव्हाण हे तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत. चव्हाण यांची भाषेवर असलेली मजबूत पकड, मुद्देसुद अभ्यासू भाषण तसेच संघटनात्मक कामांच्या जोरावर चव्हाण यांची निवड करण्यात आली. युवकांची संघटना मजबूत करण्यामध्ये चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. सर्वसामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यामध्ये चव्हाण यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो. संस्कार चव्हाण यांनी व त्यांच्या सहकार्यांनी आतापर्यंत अनेक तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन केले आहे.तसेच अनेक शैक्षणिक संस्थांना व आश्रमांना त्यांच्या माध्यमातून मदत केली आहे.

या निवडीच्या कार्यक्रमप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, शिरुर भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हा विद्यार्थी आघाडी सरचिटणीस अनिकेत राक्षे, तळेगाव शहर विद्यार्थी आघाडी माजी अध्यक्ष केदार भेगडे, पुणे शहर भाजपा युमो सरचिटणीस शिवम बालवडकर, कार्यकारणी सदस्य सोहम मुरकुटे, युवा नेते विश्वजित भेगडे, रोहित (आबा)चव्हाण, हर्षल शेलार, अनिकेत ढोरे, सुमित दाभाडे, निरज भेगडे, सौरभ भेगडे, साजिद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कुठल्याही विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयांनी कुठल्याही प्रकारचा ञास देण्याचा प्रयत्न केला तर त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहणार असल्याचे तसेच येणाऱ्या काळात तालुक्यात विद्यार्थी संवाद यात्रा सुरु करुन विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मत आपल्या निवडीनंतर संस्कार चव्हाण यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.