Maval News : शैक्षणिक शुल्क सुलभ हफत्याने भरण्याची मुभा द्या – संस्कार चव्हाण

एमपीसी न्यूज – फी भरली नाही या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्यांला शिक्षणापासून वंचित ठेऊ नये. पालकांना सुलभ हप्त्याने फी भरण्याची मुभा मिळावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष संस्कार चव्हाण यांनी केली आहे. 

संस्कार चव्हाण यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार, गटशिक्षण अधिकारी व मावळ तालुका इंग्लिश मिडियम असोसिएशन यांना दिले आहे‌. ‘उशिरा फी भरणाऱ्या पालकांकडून आर्थिक दंड आकारू नये, ऑनलाईन क्लासरूम मधुन विद्यार्थ्यांना काढले जाऊ नये, ज्या सुविधांचा वापर या वर्षात झालेला नाही त्याबाबत कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारले जाऊ नये अशी मागणी संस्कार चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, दाखला अडविणे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच, कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपुर्ण फी माफ करावी. अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संस्कार चव्हाण यांनी दिला. या वेळी हर्षल शेलार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.