Talegaon Dabhade : काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमचंद ओसवाल यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील शांतीनाथ जैन मंदिराचे विश्वस्त (Talegaon Dabhade) व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते उत्तमचंद (बाबा) ताराचंद ओसवाल (वय 72) यांचे गुरूवारी (दि. 13) रात्री 8 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

उत्तमचंद हे जागृती मित्र मंडळाचे मुख्य आधारस्तंभ व श्री हनुमान मंदिराचे विश्वस्त होते. गवताचे जूने व्यापारी म्हणून विशेष ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, सुरेश व संजय ही दोन मुले, सूना, नातवंडे, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे.

गवताचे व्यापारी रमेश, राजू व दीपक ओसवाल यांचे ते ज्येष्ठ बंधू तर सुरेश व संजय ओसवाल यांचे ते वडील होत. सकाळी अकरा वाजता तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत, असे परिवाराकडून कळविण्यात आले आहे.

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.