Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जंयती शुक्रवारी (दि. 14) साजरी होत आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील (Pimpri) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अनुयायी मोठ्या संख्येने जमा होतात. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांचा शहर परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

वाकड व पिंपरी परिसरातून येणाऱ्या मिरवणुका काळेवाडी उड्डाणपुल – शगुन चौक – पिपरी रेल्वे पुल मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येतात. भोसरी एमआयडीसी, मोशी पिंपरी परिसरातील मिरवणुका रसरंग चौक- घरोंदा हॉटेल मोरवाडी चौक मार्गे पिंपरी चौकात येतात. देहुरोड, निगडी, चिखली, चिंचवड भागातील मिरवणुका जुना मुंबई- पुणे महामार्ग येथून भक्ती शक्ती चौक, पिंपरी पोलीस स्टेशन समोरुन मोरवाडी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी चौक येथे एकत्र येतात. भोसरी पोलीस स्टेशन हददीतील मिरवणुका जुना मुंबई पुणे महामार्गाने नाशिकफाटा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी चौक येथे एकत्र येतात. मिरवणूका दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गणवेशधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलिसही नियुक्त करण्यात आले आहेत.

BARTI : ‘बार्टी’ च्या 861 विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर – मुख्यमंत्री

 

काही समाजकंटक समाजबांधवांच्या भावना भडकावून देतात.(Pimpri) जातीय सलोखा बिघडविण्याच्या दृष्टीने काही समाजकंटक, कट्टरवादी संघटना जाणीवपूर्वक जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न करीत असतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जातीय संघटना त्यांचे कार्यकर्ते आणि जातीयवादी गुंड यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून गोपनीय यंत्रणांना ‘अलर्ट’ दिला आहे.

 

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून या चौकात अभिवादन करण्यासाठी सर्वजण येत असल्याने चौकात पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.

 

असा असेल बंदोबस्त

परिमंडळ 1

19 पोलीस निरीक्षक, 74 सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, 678 अंमलदार

 

परिमंडळ 2

15 पोलीस निरीक्षक, 66 सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, 615 अंमलदार

 

गुन्हे शाखेचा बंदोबस्त

5 पोलीस निरीक्षक, 2 सहायक निरीक्षक, 70 अंमलदार

 

नियंत्रण कक्ष

हद्दीत ऐनवेळी तैनात करण्यासाठी नियंत्रण कक्ष येथे पाच अधिकारी आणि सुमारे 70 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय जलद प्रतिसाद पथक, एसआरपीएफ यासारख्या तुकड्या हद्दीत तैनात असणार आहेत. तसेच, पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्डही देण्यात आले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.