Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयाच्या भव्य मैदानात क्रीडा स्पर्धांना सुरुवात

एमपीसी न्यूज – इंद्रायणी महाविद्यालयाच्या (Talegaon Dabhade) आठ एकरमधील भव्य मैदानात तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील हे सर्वात मोठे क्रीडा मैदान असून मैदानावर विविध सुविधा केल्यानंतर भविष्यात या मैदानात भव्य स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय आणि इंद्रायणी विद्या मंदिर संस्था व रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या स्पर्धेत 52 शाळांच्या एकूण 750 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. आयोजित मावळ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार (दि 6) रोजी पार पडले.

उद्घाटन समारंभाला इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त विलास काळोखे, संदीप काकडे, बी फार्मचे प्राचार्य डॉ संजय आरोटे, मावळ तालुका क्रीडा शिक्षक समितीचे अध्यक्ष महादेव माळी, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शरद इस्कांडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डाॅ. सुरेश थरकुडे, शारिरीक शिक्षण संचालिका प्रतिभा गाडेकर तसेच मावळ तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी यांनी उपस्थिती नोंदविली. या स्पर्धेत 52 शाळांच्या एकूण 750 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

यावेळी संस्थेचे विश्वस्त विलास काळोखे, संदीप काकडे यांनी उपस्थितांना (Talegaon Dabhade) उत्तम आरोग्य व विद्यार्थी दशेतील खेळाचे महत्त्व याबद्दल सखोल मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

Pune News : आयएएसच्या 75 सायकलपटूंची पुणे टू हम्पी सहाशे किमी हेरिटेज राईडला आजपासून प्रारंभ

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे यांच्या प्रेरणेतून, सहाय्यातून आणि मार्गदर्शनातून साकारलेल्या 8 एकरातील भव्य क्रीडांगणावर उद्घाटनानंतर पार पडलेली ही सर्वात पहिली मोठी मैदानी स्पर्धा ठरलेली आहे. तालुक्यातील एकमेव असे मोठे क्रीडांगण स्पर्धांसाठी खुले झाल्याने मावळ तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.