Talegaon Dabhade: तळेगाव नगरपरिषदेला पर्यावरण दिनाचा विसर

Talegaon Dabhade: Talegaon Municipal Council Forget the environment day

एमपीसी न्यूज- जगभर जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना, तळेगाव नगरपरिषदेला पर्यावरण दिनाचा विसर पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर पर्यावरण आणि वृक्षप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी (दि.5) सर्वत्र जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध पर्यावरण रक्षणाचे उपक्रम राबविण्यात आले. मात्र नगरपरिषदेच्या उद्यान विभागास याचा पूर्णपणे विसर पडला आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरवर्षी नगरपरिषद वृक्षारोपण, उद्यान साहित्य खरेदी, वृक्ष गणना, नर्सरी व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रूपयांची वार्षिक अंदाज पत्रकात तरतूद करत असते. यावर्षीही नगरपरिषदेने उद्यान विभागासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रूपये अंदाज पत्रकात तरतूद केली आहे.

नगरपरिषदेचे उद्यान निरीक्षक यांच्याकडे जागतिक पर्यावरण दिनाबाबत विचारणा केली असता, त्यांनी इतर कामाची जबाबदारी दिली असल्याचे सांगितले.

तसेच चक्री वादळामुळे झालेली पडझड मार्गी लावण्याच्या कामात व्यस्त असल्याने पर्यावरणदिनी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही, मात्र येत्या काळात आयोजन करणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.