Talegaon Dabhade : तान्हाबाई गंगाराम केदारी यांचे निधन

एमपीसी न्यूज- ताजे (मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ माता तान्हाबाई गंगाराम केदारी (वय 75) यांचे गुरुवारी (दि 12)संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

ताजे गावचे पोलीस पाटील तसेच पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे सदस्य अरूण केदारी यांच्या त्या मातोश्री तर गुणवंत कामगार तेजस (बाबाजी) केदारी यांच्या त्या आजी होत. तान्हाबाई यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडेनऊ वाजता ताजे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.