Talegaon Dabhade : यशवंतनगर येथे बुधवारी तर राव कॉलनी येथे गुरुवारी भरणार आठवडे बाजार

एमपीसी न्यूज- नगरसेवक किशोर भेगडे यांच्या संकल्पनेतून तळेगावमधील स्टेशनभागात यशवंतनगरमध्ये तर गावभागात राव कॉलनी येथे शेतकरी आठवडे बाजार चालू करण्यात आला.आहे. यशवंत नगर येथे गोळवलकर गुरुजी मैदानाजवळ दर बुधवारी तर राव कॉलनी येथे बॉम्बे वर्कशॉप, बादशाही चहा समोर दर गुरुवारी हा आठवडे बाजार भरणार आहे. दोन्ही ठिकाणी दुपारी 3 ते रात्री 8 अशी या बाजाराची वेळ असणार आहे.

या आठवडे बाजाराच्या उदघाटन प्रसंगी नगरसेवक किशोर भेगडे, संदीप शेळके, अरुण माने, संतोष भेगडे, सचिन भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, माजी नगराध्यक्ष नाना कारके, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, माजी उपनगराध्यक्ष अशोक भेगडे, माजी शिक्षण मंडळ सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला, चेतन भेगडे, आदी उपस्थित होते.

गटशेती करून शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून हा आठवडे बाजार सुरु करण्यात आला आहे. आहे. नागरिकांना ताजी भाजी थेट त्यांच्या दारात मिळावी व शेतकरी बंधूंना देखील दोन रुपये फायदा व्हावा हा या मागील उद्देश आहे. स्वच्छ व ताजा भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून मिळत असल्याने ग्राहक देखील खुश झाले आहेत. आठवडे बाजार कायमस्वरूपी राहावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या आठवडे बाजारामध्ये सेंद्रिय व गावरान भाजीपाला-फळे, धान्य, कडधान्य, राजसी भाजीपाला, मसाले, लोणचे, पापड, गावरान तूप, अंडी उपलब्ध असणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका मंगलताई भेगडे व अनिकेत भेगडे यांनी केले तर संयोजन तुषार वहिले व सौरभ सावले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.