Talegaon Dabhade : सर्व समाजाला सामावून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे किशोर आवारे – भास्कर महाराज रसाळ

एमपीसी न्यूज – जनसेवा ही ईश्वर सेवेपेक्षाही श्रेष्ठ आहे. अशी (Talegaon Dabhade) जनसेवा किशोर आवारे यांनी दीन-पतित आणि गरिबांसाठी पोटतिडकीने केली. त्यांनी प्रत्येक समाजातील व्यक्तीला एका धाग्यात बांधून घेतले. सर्व समाजाला सामावून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे किशोर आवारे होते, असे प्रतिपादन हभप भास्कर महाराज रसाळ यांनी केले.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष कै. किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव शहरात ठीक ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच स्वप्ननगरी अपार्टमेंट समोर इंद्रायणी कॉलनी तळेगाव स्टेशन येथे रामायणाचार्य हभप भास्कर महाराज रसाळ यांची प्रवचनरूपी सेवा संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सत्यशील राजे दाभाडे सरकार, पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, बीएमके उद्योग समुहाचे बाळासाहेब काकडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, सामाजिक कार्यकर्ते विष्णू खांदवे, हभप मनोहर ढमाले,माजी नगरसेवक सुशील सैंदाणे,नितीन मराठे,अशोक दाभाडे, गिरीश खेर, संतोष शिंदे, महिला भगिनी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हभप भास्कर महाराज रसाळ म्हणाले, “कोविड सारख्या काळात (Talegaon Dabhade) स्वतःच्या रकमेतून लक्षावधी रुपये खर्चून किशोर आवारे यांनी हजारो जणांचे जीव वाचवले.

आपल्या सामाजिक, राजकीय जीवनात त्यांनी नेहमी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. देहरूपी किशोर आवारे जरी आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या या कार्याच्या आठवणींनी आज ते प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत.”

शुरविरांची चरित्रे वाचली तर आत्मशांती प्राप्त होते असे सांगत रसाळ महाराज यांनी उपस्थितांना संतुलित आहाराचे महत्व सांगितले. आरोग्य सांभाळण्याचा सल्ला देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेण्याचा आग्रह केला.

गणेश काकडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात ते म्हणाले किशोर भाऊंचे उर्वरित राहिलेले सामाजिक कार्य आम्ही येथून पुढे चालू ठेवून सर्व कार्यकर्त्यांना एकित्रित घेऊन काम करणार आहोत. तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

Moshi : स्त्रियांच्या साहित्याला दुय्यम स्थान – डॉ. संगीता बर्वे

आर एम के उद्योग समुहाचे मुख्य प्रवर्तक रामदास काकडे आपल्या मनोगतात म्हणाले की, गोरगरिबांचे कैवारी म्हणून किशोर आवारे यांचा समाजात नावलौकिक होता.

समाजातील दीनदुबळ्या शोषितांना मदत करण्यामध्ये ते कायमच अग्रेसर होते. किशोर आवारे यांनी आरंभलेली उर्वरित कामे आपण पूर्ण करू. किशोर आवारे यांचा समाजसेवेचा वारसा अविरतपणे चालू ठेवू. कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांच्या सुख- दु:खात ठामपणे उभे राहण्याचेही काकडे यांनी आश्वासन दिले.

सूत्रसंचालन कल्पेश भगत यांनी केले तर आभार हभप मनोहर मामा ढमाले यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.