Talegaon Dabhade : तुळसाबाई शिंदे-पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील चांदखेड येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील श्रीमती तुळसाबाई सोपानराव शिंदे- पाटील यांचे शनिवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या.

त्यांच्या मागे तीन मुले,चार मुली, सूना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा धार्मिक कार्यांत नेहमी सहभाग असायचा.

सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ शिंदे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष शिंदे आणि पुणे येथील प्रसिद्ध वकील चंद्रकांत शिंदे यांच्या त्या मातोश्री तर, आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अंकुश भेगडे यांच्या त्या सासूबाई होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.