BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : उद्योजक शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ नेते, यशस्वी उद्योजक शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने मावळ तालुक्यातील सर्व सभासदांना छत्री वाटप करण्यात आले.

यावेळी तळेगांवचे जेष्ठ उद्योजक शंकरराव शेळके, नगरसेवक भिमाजीराव शेळके, उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे, जेष्ठ उद्योजक बाळासाहेब शेळके, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, सहकार भारतीचे अध्यक्ष सुनील गायकवाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास भेगडे, उद्योजक, विलास काळोखे, किरण काकडे, माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष सुधाकरराव देशमुख, सदस्य आणि स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान मावळचे कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3