Talegaon : श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांच्या चित्रांचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांचे चित्र महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शऩाखाली चित्रकार प्रमोद मोर्ती यांनी साकारले आहे .या चित्राचा लोकार्पण सोहळा नुकताच पुण्यात झाला.

पुण्यातील वीर बाजी पासलकर स्मारक येथे झालेल्या या चित्राचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून फर्जद चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडेसह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमंगुडे, सुभेदार पिलाजीराजे जाधवराव यांच्या स्नुषा वंषज सुवर्णलता राजे जाधवराव, इतिहासकार अड. रवींद्र यादव, सत्यशील राजे दाभाडे आदी उपस्थित होते.

या एतिहासिक सोहळ्यात एतिहासिक घराण्यातीलमहेंद्र पेशवे, अभयराज शिरोळे, दादाराजे देसाई निपाणकर, रमेश रायजाधे, समरजितसिंह निंबाळकर (धारराव), अजयसिंह सावंत, सतीशराजे भोसले पंजावर, संदीप पोतनीस, डॉ. रजनी इंदुलकर उपस्थित होते.

श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांनी 1732 मध्ये जोरावर खान बाबी या मोगलाचा पराभव केला व या हिंदवी स्वराज्याच्या एकमेव महिला सरसेनापती ठरल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.